You are currently viewing पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून  बंधनकारक

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून  बंधनकारक

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून  बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम नुसार जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून 2024 पासून बंधनकारक करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम 2009 तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहे.

 केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन (NDLM) भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म मृत्यु नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तातंरण यांचा समावेश आहे. थोडक्यात सदर प्रणालीमध्ये संबधित पशुधनाची प्रजनन आरोग्य मालकी हक्क, जन्म मृत्यु, ई सर्व माहीती उपलब्ध होते. त्याकरीता सर्व पशुधनास कानात Tag (बिल्ला) लावुन त्यांची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास कानात Tag (बिल्ला) लावुन त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोदणी प्रक्रिया सुरु आहे.

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहीती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणे करुन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरीता तसेच प्राण्यामधील संक्रमण व सांगसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे.

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम २००९ व शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना प्राप्त अधिकारान्वये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून २०२४ पासुन बंधनकारक करण्याबाबत खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.

ग्रामपंचायत, नगरपरीषद, सर्वांना सुचित करण्यात येते की, दिनांक ०१ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैदयकीय संस्था / दवाखान्यामधुन पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तसेच असल्याशिवाय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येवु नये.

सर्व महसुल/वन/वीज महावितरण विभाग यांना सुचित करण्यात येते की, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.

 कोणत्याही पशुधनाची वाहतुक ईअर टॅग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

 परराज्यातुन येणाऱ्या पशुधनास ईअर टॅगिंग केल्याची व त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. दिनांक ०१ जून २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातुन महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतुक ईअर टैगिंग शिवाय करता येणार नाही.

दिनांक ०१ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा गावातील खरेदी- विक्री व बैल गाडा शर्यत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येवु नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबधित बाजार समितीने घ्यावी, तसेच सर्व ग्रामपंचायत / महसुल विभाग/ गृह विभाग यांना ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैल गाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवु नये.

पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा (Owner Transfer) बाबतच्या नोंदी संबधित पशुवैदयकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अदयावत करुन घेण्याची जबाबदारी संबधित पशुपालकाची राहील.

ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परीवर्तनाचा दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवु नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमुद करण्यात यावा. उपरोक्त पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलिस विभाग, वन विभाग, महसुल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, नगरपरिषद / नगर पंचायत, ग्रामपंचायत), उपप्रादेशिक परीवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषगिंक प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा