*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मैत्री माझा श्वास*
जीवात जीव असेपर्यंत
मैत्री माझा श्वास
कृष्ण अन् सुदामासारखी
मैत्री असावी खास
मैत्रीत नको हेवेदावे
नसावे कधीही भांडण
मैत्री म्हणजे विश्वासाच
अतूट नाण
मैत्री असावी
चंद्रासारखी शितल
तर कधी
कुसूमाहून कोमल
मैत्री असावी
सुर्यासारखी तेजस्वी
मैत्रीचे तेज पसरेल
प्रकाशमय , मधुर ओजस्वी
मैत्री असावी..
सागरासम विशाल
दु:ख,वेदनांचा
दूर व्हावा काल
मैत्रीत नसावा
अंहकार
मैत्रीच्या धाग्यांनी
जोडावा मैत्रीचा परीवार
मैत्री असावी मधुर
निरपेक्ष, निस्वार्थी
दाही दिशा पसरेल
अमर मैत्रीची मग किर्ती
*अनुपमा जाधव(शिक्षिका)*
*के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू*
*भ्रमणध्वनी* *८७९३२११०१७*
🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️