*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आईविना जग*
आईविना जग
जणू जलाविन मासा
तडफडतो कसा
मनात…..
आई प्राणदाती
चैतन्याचे पाजते स्तन्य
उपकार अनन्य
तिचेच…..
कलागुणांचे आगर
शिकवते आपल्या कृतीतून
संस्कारांच्या मुशीतून
घडवते…..
आईचा पदर
आधार वाटतो जिवाला
धीराच्या शब्दाला
तीच…..
आभाळ मायेचं
जेव्हा जातं उसवून
जातो कोलमडून
मनाने….
उणीव आईची
भरत नाही कशाने
भरते आठवणीने
ह्रदय…..
आईची शिकवण
शिदोरी जन्मभर पुरते
जीवन तरते
आशिर्वादाने…..।।
अरुणा दुद्दलवार@✍️