ही कविता नसून औषध आहे:
डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी
माणूस काय करतो ?
कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !
बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
सारं काही असूनही ,
एकलकोंडे झालेत !
भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !
आपल्या माणसांजवळ ,
व्यक्त झालं पाहिजे !
खरं खरं दुःख सांगून ,
मोकळं रडलं पाहिजे !
हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !
कुणाशी तरी बोला म्हणजे ,
हलकं हलकं वाटेल !
दुःख जरी असलं तरी ,
मस्त जगावं वाटेल !
येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !
आपली माणसं , आपली माणसं,
बाजारात मिळत नसतात !
नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !
भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !
हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
काही कामाचे नसतात !
तुझी पाठ वळली की ,
कुत्सितपणे हसतात !
हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
” रोबोट “तरी आणून ठेव !
रोबोटच्याच गळ्यात पडून ,
हसत जा , रडत जा !
शांत झोप येण्यासाठी ,
दररोज गोळ्या घेत जा !
दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,
इथून पुढे भिशी कर ,
हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी औषधं आहेत ,
डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!
…… कवी …..
*डॉ. विश्वनाथ पाटील*
एम डी मानसोपचारतज्ज्ञ
Chan