You are currently viewing शिरवल‌ येथील श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरात भक्तिमय वातावरण

शिरवल‌ येथील श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरात भक्तिमय वातावरण

*शिरवल‌ येथील श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरात भक्तिमय वातावरण **

*ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह निमित्ताने प्रतिपंढरपूर अवतरले *

कणकवली

कणकवली तालुक्यातील शिरवल टेंबवाडी येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रमाच्या‌ निमित्ताने येथे प्रतिपंढरपूर अवतरले आहे.भाविक भक्त आणि संत मंडळी टाळ मृदंगांच्या साथीने हरिनामात तल्लीन होऊन विठ्ठल नामाचा गजर करीत आहेत.

संत मंडळी आणि भक्त मंडळी भक्ती रसात न्हावून गेली आहेत.विठ्ठल रखुमाई माऊलींच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाले असुन भक्तांची मांदियाळी पसरली आहे.”याची देही याची डोळा “येथे संत मेळा साकारल्याचे दिसत आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन मंगळवार, दि. ७ मे ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज, शेगाव यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग,सर्व वारकरी व शिरवल गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .

श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरात ७ मे ते १४ मे या कालावधीत दररोज
सकाळी ५ ते ६.३० काकड आरती ,सकाळी ६.३० ते ७.३० श्रींची महापूजा,सकाळी ८ ते १२ ग्रंथवाचन, दुपारी १२.३० ते २.०० महाप्रसाद, दुपारी ३ ते ५.०० ग्रंथवाचन, सायं. ६.३० ते ७.३० हरिपाठ,रात्रौ ८ ते १० किर्तन रात्रौ १० नंतर महाप्रसाद, असे कार्यक्रम सुरु असुन भाविक भक्तांच्या उपस्थितीत अलोट गर्दीत विठ्ठलमय वातावरण बनले आहे.

भक्तिमय वातावरणात श्री.विठ्ठल‌-रखुमाई मंदिरात भक्त मंडळी नामस्मरणात तल्लीन होऊन गेली आहे.१० मे रोजी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम समारंभ‌ संपन्न झाला.

‌७ मे ते १३ मे या कालावधीत गजर माऊलीचा, उत्सव किर्तनाचा या कार्यक्रमात नामवंत किर्तनकारांनी आपली किर्तनरुपी सेवा सादर करुन वैचारिक आणि धार्मिक प्रबोधन करुन‌ जनमानसात सकारात्मक उर्जा दिली आहे. या निमित्ताने श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून गेला असुन भाविक भक्त तल्लीन होऊन भक्ती रसात न्हाऊन गेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा