You are currently viewing झाराप येथे “तिमिरातून तेजाकडे” चळवळीचे प्रणेते तथा सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

झाराप येथे “तिमिरातून तेजाकडे” चळवळीचे प्रणेते तथा सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

*झाराप ग्रामस्थ मंडळाचे आयोजन*

 

सावंतवाडी : (प्रतिनिधी)

झाराप ग्रामस्थ मंडळाच्यावतीने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. जिल्हा परिषद शाळा झाराप नंबर-1 मध्ये “तिमिरातून तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमाशुल्क अधिकारी श्री सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन झाराप ग्रामस्थ मंडळ, झारापच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण बोर्डची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रात शालांत परीक्षेत दहावी असो किंवा बारावी कोकण बोर्ड अव्वल येत आहे. परंतु कोकणातून अव्वल येणाऱ्या मुलांचे पुढे काय होते..? गुणवत्ता यादीत येणारे पुढे सरकारी अधिकारी म्हणून जिल्ह्यात येतात का..? या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी येतं. कोकणातील हेच उच्च दर्जाचे टॅलेंट शोधून त्यांना शैक्षणिक प्रवचनाच्या माध्यमातून भविष्यातील अधिकारी घडविणे हे स्वप्न उराशी बाळगून कोकणातीलच एक सीमाशुल्क विभागातील अधिकारी श्री सत्यवान रेडकर कार्यरत आहेत. दिवसा रात्री कधीही वेळेचे बंधन न ठेवता कोकणातील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. यासाठीच त्यांनी “तिमिरातून तेजाकडे” ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली आहे. त्यांचे शैक्षणिक कीर्तन किंवा प्रवचन मुलांच्या आणि पालकांच्या कानावर पडले तर त्यांची भविष्यातील दिशा बदलण्यास सुरुवात होते. अशी प्रामाणिक इच्छा बाळगून श्री.सत्यवान रेडकर मोफत मार्गदर्शन करतात. जेणेकरून कोकणात जास्तीतजास्त भागात शासकीय कर्मचाऱ्यांची गावे दिसतील. दि.17 किंवा 18 मे रोजी देखील इतर कुणीही रात्री अथवा सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन केल्यास ते मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासाठी त्यांचा संपर्क क्र.9969657820 यावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा