You are currently viewing हाका

हाका

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हाका*

 

जरी संकटे कितीही आली

पराभवांची सीमा झाली.

तरी कधी ना खचायचे

विश्वच नवे रचायचे

 

 

अन्यायाचा करा सामना

न्यायाची मनी असो कामना

गाडून टाका अत्याचारा

जाळून टाका अनाचारा

 

 

दुर्बलतेचे नकोच जीणे

अगतिकतेचे नकोच गाणे

धैर्य धरुनि पाऊल टाका

दुरुन यशाच्या ऐका हाका

 

 

 

*कवयित्री*

*अनुपमा जाधव*

*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा