देवगड नांदगांव मार्गावर स्कॉर्पिओ आणि रिक्षात अपघात; एकजण ठार
देवगड
देवगड नांदगांव मार्गावर कट्टा तिठ्या नजिक धोकादायक वळणावर स्कॉर्पिओ आणि रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील प्रवाशी राजेश विष्णू शेडगे(५०) रा.कट्टा भंडारवाडी हे जागीच ठार झाले.या अपघातात रिक्षाचालक अक्ष विवेकनंद कीर(२७) रा कट्टा हा देखिल गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात रविवारी सायंकाळी ५.२० वा.सुमारास झाला.
वरेरी येथून राजेश भाऊसाहेब कदम(३३) रा.जुना पनवेल हा स्कॉर्पिओ गाडी घेवून देवगडचा दिशेने जात होता.या गाडीमध्ये वरेरी येथील मंगेश सावंत, मेव्हणे संज सोलकर व त्यांचे भांडूप मुंबई येथील दोन मित्र तसेच सावंत यांची दोन मुले व मुंबईहून वरेरी येथे आलेली दोन मुले यांना घेवून देवगड बीच येथे फिरण्यासाठी जात होते.दरम्यान कट्टा येथील रिक्षाचालक अक्ष विवेक कीर हे देवगड येथून आपल्या मालकीची रिक्षा घेवून कट्टा येथे येत होते.
यावेळी त्यांचा रिक्षेमध्ये कट्टा भंडारवाडा येथील राजेश विष्णु शेडगे(५०), त्यांचा मुलगा श्लोक राजेश शेडगे(११) त्याचा मित्र आदिश नागेश करंगुटकर(१२) हे प्रवास करीत होते.राजेश शेडगे हे रविवारीच मुंबईहून गावी कुटूंबियांसमवेत १७ मे रोजी वार्षिक गोंधळ असल्याने या र्काक्रमासाठी आले होते.देवगडमध्ये ते साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते.साहित्य खरेदी करून झाल्यानंतर गावातीलच अक्षय कीर यांच्या रिक्षेने मुलगा व त्याचा मित्र यांच्यासमवेत घरी कट्टा येथे येत होते.
कट्टा तिठ्यानजिक धोकादायक वळण ठरले घातवळण
देवगडहून कट्टा येथे रिक्षेने घरी परतत असतानाच शेडगे कुटूंबियांवर काळाने घाला घातला.काळरूपी स्कॉर्पिओ त्यांच्यासाठी काळच ठरली.वरेरी येथून भरधाव वेगाने येणार्या स्कॉर्पिओ चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणार्या रिक्षेला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात रिक्षा व स्कॉर्पिओ गाडी रस्त्याचा एका बाजुला गडग्यावर जावून धडकली.तर रिक्षा पलटी होवून रस्त्याचा बाजुला जावून रिक्षेतील प्रवाशी शेडगे यांच्या अंगावर आदळली या घटनेत त्यांचा डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती समजताच त्या घटनेदरम्यान तेथून दुचाकीने प्रवास करणारे कट्टी येथीलच रमेश प्रभू यांनी घटनास्थळी थांबले व अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल कट्टा ग्रामस्थांसमवेत प्रभू यांनी मदतर्का राबविले.अपघातग्रस्त रिक्षा मधील जखमी प्रवाशांना बाजुला करून तात्काळ १०५ रूग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.देवगड पोलिस स्टेशनला कळविताच पोलिस उपनिरिक्षक विनायक केसरकर, पो.हे.कॉ.प्रविण सावंत, महेंद्र महाडिक, पो.कॉ.विशाल वैजल, भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील चालक राजेश कदम हा गाडीतून बाहेर पडून देवगडकडे जाण्याचा तयारीत होता मात्र त्याला माहिती नसल्यामुळे तो उलट दिशेने घाडणीचे पाणी या ठिकाणी गेला.तर स्कॉर्पिओमधील वरेरी येथील मंगेश सावंत यांनी पोलिस स्टेशनला येवून माहिती दिली.मंगेश सावंत यांचे मेव्हणे सोलकर हे दोन मित्रांसमवेत दोन मुलांना घेवून शनिवारी वरेरी येथे पनवले कोंडगाव येथील जेरीन डेव्हीड कल्लू परंबीळ यांच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी भाड्याने घेवून आले होते.त्या गाडीवर राजेश कदम हा चालक होता.रविवारी ते कुणकेश्वर येथे फिरून आले सांकाळी ते देवगड बीच व पवनचक्की गार्डन येथे फिरण्यासाठी जात होते.या अपघातात रिक्षाचालक अक्ष कीर याच्या डोक्याला, उजव्या हाताला, डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे तर श्लोक याला मुका मार व आदिश याला डाव्या डोळ्याचा वरती दुखापत झाली आहे.यांच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले तर रिक्षाचालक कीर यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुढे हलविण्यात आले.ठाणे बदलापूर येथे रेल्वेमध्ये नोकरीला असणारे या अपघातात मयत झालेले राजेश शेडगे हे १७ मे रोजी गावात वार्षिक गोंधळाचा र्काक्रम असल्याने सकाळीच ठाणे बदलापूर येथून गावी आले होते.
स्कॉर्पिओतील चालकाला सायंकाळी ७.३० वा.सुमारास पोलिस हे.कॉ.प्रविण सावंत यांनी त्याचे मोबाईल लोकेशन घेवून घाडणीचे पाणी या ठिकाणहून ताब्यात घेतले.
अपघातानंतर कट्टा ग्रामस्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल
अपघातातील रिक्षामधील प्रवाशी हे कट्टा गावातील असल्याने सर्व कट्टा ग्रामस्थ यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.कट्टा तिठ्यानजिक असलेल्या रघुवीर चौगुले यांच्या घरासमोरील धोकादायक वळणावर काम अपघात होत असून यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*