पाडलोस रवळनाथ मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम करणाऱ्यांचा सन्मान…
बांदा
पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान, दातृत्व लाभले आहे. जवळपास 55 वर्षांनी छप्पराची दुरुस्ती करण्यात आली आहे. देवस्थानच्या उद्धारासाठी सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे मानकरी आनंद गावडे, नंदा गावडे यांनी सांगितले.
पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम करणाऱ्या मेस्त्री, लाईट काम, रंगकाम तसेच विशेष सहकार्य करणाऱ्यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये नंदा गावडे, आनंद गावडे, रामदास केणी, सुनील सुभाष गावडे, महेश गावडे, सखाराम मेस्त्री, सुमन गावडे, सुरत गावडे, अमित गावडे, गुंडू नाईक, इंद्रसेन गावडे, प्रशांत माधव, सुनील विठ्ठल गावडे, नामदेव नाईक, विलास गावडे, सत्यवान नाईक, तुकाराम मेस्त्री, संतोष आंबेकर, मनोज गावडे, साहिल गावडे, राजन पटेकर, दत्ताराम गावडे, देऊ गावडे, मुकुंद गावडे, नामदेव न्हावी यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिराचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी दारू सामानाची आतषबाजी करण्यात आली. सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले. आभार हरी गावडे यांनी मानले.