You are currently viewing गुरुवार, १६ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला

गुरुवार, १६ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला

*गुरुवार, १६ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला*

पिंपरी

मधुश्री कला आविष्कार आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १६ मे २०२४ पासून तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, सेक्टर २७, प्लॉट नं. ५१३, संत तुकाराम उद्यानासमोर, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक ६:३० वाजता व्याख्यानमाला सुरू होणार असून तपशील खालीलप्रमाणे आहे.

गुरुवार, १६ मे रोजी ‘कलारसिक ते सिनेनिर्माते’ या विषयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे प्रथम पुष्प गुंफतील. कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे अध्यक्षस्थान भूषविणार असून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. शुक्रवार, दिनांक १७ मे रोजी ‘शिवाजीराजे जन्माला यावेत पण शेजारच्या घरात!’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिबीकर द्वितीय पुष्पाची गुंफण करणार असून माजी महापौर आर. एस. कुमार अध्यक्षस्थानी असतील आणि उद्योजक अतुल इनामदार यांची प्रमुख उपस्थित राहील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प शनिवार, दिनांक १८ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव ‘गीता सार – जगण्याचा आधार’ या विषयावर गुंफतील. याप्रसंगी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार अध्यक्षस्थान भूषविणार असून युवा कार्यकर्ते अनुप मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

व्याख्यानांपूर्वी सायंकाळी ६:०० वाजता श्रोत्यांसाठी चहापान व्यवस्था केली आहे. विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा