You are currently viewing माय

माय

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माय*

 

साधीसुधी माय माझी

खेडूत अडाणी.

माझ्यासाठी खाये खस्ता

फिरे रानीवनी.

 

 

उन्हातान्हामधी माय

काट्यातून जाई.

घरासाठी दैन्याचिही

पर्वा केली नाही.

 

 

माय करते निंदणी

कापणी काढणी.

गवताचे भारे माय

डोईवरी आणी.

 

 

माय माझी मले म्हणे

खूप शिक पोरी!

शयरामधी जाऊनी

कर तू नौकरी!

 

 

पाटी पुस्तक घेऊन

जाते मी साळात.

तवा माय होते खूश

हासते गालात.

 

 

*अनुपमा जाधव*

*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा