You are currently viewing तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविल्याने बांद्यातील पाणी पातळीत कमालीची वाढ…

तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविल्याने बांद्यातील पाणी पातळीत कमालीची वाढ…

‌तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविल्याने बांद्यातील पाणी पातळीत कमालीची वाढ…

माजी उपसरपंच जावेद खतीब यांच्या आंदोलनाचे यश…

बांदा

तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने शाखा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी बांदा परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
महिनाभरापूर्वी पाणी कमी असल्याचे कारण देत बांदा शाखा कालव्यातील पाणी बंद करण्यात आले होते. त्यामुळे याचा परिणाम येथील विहिरीच्या पाणी पातळीवर झाला होता. तसेच स्थानिक ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर देखील याचा विपरीत परिणाम झाला होता. बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्यात पूर्ववत पाणी न सोडल्यास कालव्यात बसून आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता.
काही दिवसांपूर्वी कालव्यातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आता पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सुरु झाल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून बागायतीना देखील कालव्याचे पाणी मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी पोहोचले आहे. पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
बांदा ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेला देखील या कालव्याचा फायदा झाला आहे. कालव्यातील पाणी अचानक बंद करण्यात आल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. आता मात्र पाणी पूर्ववत सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा