देवगड पवनचक्की येथील दोन व्यावसायिकांमध्ये राडा; परस्पर विरोधी तक्रारी दाखल
दहा जणांवर गुन्हे दाखल, तीन महिलांचा समावेश
देवगड
देवगड पवनचक्की येथील दोन स्टॉल धारकांमध्ये राडा झाला असून याप्रकरणी देवगड पोलीस ठाणे मध्ये परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कीर्ती कृष्णा घाडी वय 25 सध्या राहणार पवनचक्की देवगड मूळ राहणार डोंबिवली मुंबई हिने दिलेल्या तक्रारीमध्ये शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पवनचक्की येथील सत्यवान जोईल यांच्या मालकीच्या वडापावच्या स्टॉलवर नाश्त्याचे पदार्थ बनवीत असताना या स्टॉलच्या शेजारी बाजूस असलेल्या पाणीपुरी स्टॉल धारक शैलेश भुजबळ याने माझा आते भाऊ सनित सत्यवान जोईल यास बोलावून घेऊन तू लय शहाणा झालायस काय असे विचारून त्याला मारण्यास सुरुवात केली
त्यावेळी त्या मारहाणीचे शूटिंग करत असताना सुप्रिया भुजबळ व शितल जोईल यांनी माझ्या अंगावर धाव घेऊन मला मारण्यास सुरुवात केली तसेच शैलेश भुजबळ याने सनीत यास लाथा बुक्क्याने मारहाण केली त्याचबरोबर शैलेश भुजबळ यांच्या समावेत असलेले मंजी काका व हेमंत जोईल यांनी माझी आते स्मिता सत्यवान जोईल काका सत्यवान वसंत जोईल व आत्ते भाऊ सनीत जोईल यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सुप्रिया भुजबळ शितल जोईल शैलेश भुजबळ मंजी काका, हेमंत जोईल या पाच जणांविरुद्ध भादवि कलम 354 352 323 504 506 143 147 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे
तर ईश्वरी शैलेश भुजबळ हिने दिलेल्या तक्रारी मध्ये दिनांक 10 मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता आपल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर असलेले सासरे मंजिनाथ वसंत भुजबळ यांना सनित सत्यवान जोईल यांनी शिवीगाळ केली याबाबत विचारणा करायला गेल्यावर त्याने मलाही शिवीगाळ केली यावेळी आपले पती शैलेश भुजबळ हेआले असता त्यांनाही शिवीगाळ करून सनित सत्यवान जोईल सत्यवान वसंत जोईल, रज्जा अंकुश चव्हाण, या तिघांनी हाताच्या थापटाने पाठीवर छातीवर पोटावर मारहाण करून दुखापत केली त्याचबरोबर कीर्ती कृष्णा घाडी व स्मिता सत्यवान जोईल यांनीही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी सनित सत्यवान जोईल सत्यवान वसंत जोईल कीर्ती कृष्णा घाडी स्मिता सत्यवान जोईल व रज्जा अंकुश चव्हाण या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत