You are currently viewing बाप

बाप

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप*

 

आईची थोरवी सगळेच गातात

बापाला मात्र कमी का लेखतात ?

आई थोरच असते

हे तर सर्व मान्यच आहे

पण बापही थोर असतो

हेही ध्यानात घेतलं पाहिजे

 

 

आई घर सांभाळते

मुलांचे संगोपन करते

तेव्हा बाप भटकत असतो वणवण

घर चालवण्यासाठी काळजी करीत

दारिद्रयाचे चटके

स्वतः सोसत

 

 

आई धरणी सारखी असली

तर बाप असतो आकाशासारखा

आई असते वेली सारखी

तर बाप असतो झाडासारखा

 

 

दु:ख झालं तर

आपण आईला आठवतो

संकट आलं तर

बाप रे म्हणतो

 

 

म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे

बापही आहे श्रेष्ठ

बापही आहे थोर

फणसासारखा आतून मऊ

वरुन दिसतो जरी कठोर

 

 

कवयित्री

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा