*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित भावस्पर्शी गझलरचना*
*डॉ. दाभोलकर खून खटला*
————————–
न्याय निवाडा झाला तरीही दुस्तर ही वाट आहे
खुन्यांना शिक्षा झाली तरी सूत्रधार मोकाट आहे
करून सवरून नामा निराळे जुने यांचे तत्व आहे
पाळेमुळे खणून त्यांचे मोडावे लागणार पेकाट आहे
धर्मापेक्षा यांना चिंता बंद होत्या दुकानदारीची आहे
धर्म खतरमे चा हा सारा वायफळ चुकचुकाट आहे
उलटी धरली मशाल विझण्या पेक्षा उफाळून येते
पाठिंब्याची पहा केव्हढी उसळली ही लाट आहे
अजून लढणे बाकी आहे, हिम्मत कुणीच हरले नाही
विवेकी विचारांचा करायचाय रुंद, सुंदर घाट आहे
श्रीनिवास गडकरी
रोहा पेणं पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
@ सर्व हक्क सुरक्षित