*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*आखाजीनी पायरी*
आखाजीना लयां (लळा)
लेकूरवायिस्ना मेयां (मेळा)
माहेराले येतंस
सण साजरा करतंस
आया बहिणीस्ले भेटतंस
बाप ना दारले
सालभरमां एकदावच
हक न पाय लावतंस
घागर पुंजतस
आंबाना रस
पुरणनी पोई खातंस
गाणी म्हणतंस
फुगड्या खेयतंस
झोकावं झुलतंस
मैत्रिणीस्न्या गाठीभेटी घेतंस
खुपच मजा करतीस
दोनच दिनमां
सासर इसरी जातंस
सासुरवाशिन्या पोरी
सासरनं गाडं
रोजच वढतंस
माहेरनी पायरी
फकस्त
आखाजीले चढतंस
आखाजीले चढतंस
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208668477.
7588318543.