बुलढाणा :
बुलढाणा येथिल सामाजिक कार्यकर्त्या तथा संचालक अध्यक्षा -हिरकणी महिला प्रशिक्षण केंद्र तसेच माऊली ग्रामिण विकास बहु. संस्था बोर खेड ता.जि बुलढाणा सौ. अलका संतोष खांडवे यांना या वर्षीचा हिरकणी’ संजीवनी ‘ राज्य स्तरीय सामाजिक पुरस्कार २०२४ संजीवनी संस्थेचेच्या वतीने जाहीर करण्यात आला.
केळवद येथिल संजीवनी बहु . शिक्षण प्रसारक संस्था ही दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचा संस्थेव्दारा कार्याची दखल घेवून सत्कार व मानपत्र देवून सन्मानित करीत असते. यावर्षीही बुलढाणा येथिल सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ. अलका संतोष खांडवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून पुरस्कार समिती व्दारा त्यांची निवड करण्यात आली.
अलका खांडवे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बचत गट, शिलाई केंद्र, शासकिय योजना, प्रचार व प्रसार विधवा परितक्ता महिला यांना मदत व समुपदेशन शिबीरे आयोजित करणे, धरणातील गाळ काढणे, त्याच बरोबर व्यसन मुक्ती आणि सामुहिक लग्नसाठी लोकांना प्रोत्साहित करणे, आदी कार्य त्यांच्या संस्थे व्दारा सुरु आहे.