सावंतवाडी-बाहेरचावाडा भागात पुन्हा गढूळ पाणी…
सावंतवाडी
येथील बाहेरचावाडा परिसरात पुरवठा होणारे पाणी पुन्हा गढूळ येत आहे. गेले ८ ते १० दिवस हा प्रकार सुरू आहे. याबाबतची माहिती भाजपचे युवा कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी दिली. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे रोगराई पसरली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.
१५ ते २० दिवसापूर्वी तेथील माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी याबाबत माहिती देऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. यावेळी परिसरातील व्हाॅल्व साफ केल्याने काही दिवस गढूळ पाणी आले, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे होते. परंतु हा प्रकार सुरूच असल्यामुळे परिसरात नाराजीचे सूर आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.
\