*ज्येष्ठ लेखिका रेखा कोरे लिखित महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त लेख*
*अक्षय तृतीया*
जन्म – इस. ११३१ मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हातील बागवाडी या गावी एका शैव ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांच्या आईचे नाव – मादलांबिके आणि वडिलांचे नाव मादरस या बालकाचे नाव बसव + ईश्वर = बसवेश्वर असे ठेवण्यात आले. घराण्याचे गुरु – जातवेदमुनी होते.
जन्मल्यानंतर काही वेळातच हे बालक वेदनेने आकांत करीत असताना त्यांच्या गुरूंनी त्या बालकाच्या गळ्यात शिवलिंग बांधले.
वयाच्या ८ व्या वर्षी उपनयन (मुंज) करून घेण्यास विरोध केला.त्यानंतर घर सोडून जातवेद मुनींच्या आश्रमात १२ वर्ष अध्ययन केली. त्याच सोबत सोबत कुडल-संगम देवाची [ शिवाची] आराधना केली. त्यांनी ही आपली आराधना, अभ्यास आणि अध्ययन, वचन रुपाने व्यक्त केले.मुक्तछंद, काहीशी गद्यमय सादृश्य शैलीमध्ये शब्दबद्ध केलेल्या वचनांची ख्याती [प्रसिद्धी] कर्नाटक मध्येच नव्हे तर सर्वदूर पसरली.
बलदेव मामांच्या भेटीनंतर ते म राजा बिज्जलांचे प्रथम कोषाध्यक्ष आणि नंतर प्रधानमंत्री झाले.आणि वीरशैव लिंगायत धर्माचे पुनरूज्जीवन कर्ते,
धर्मसुधारक संत बसवेश्वर महात्मा बसवेश्वर समतावादी बसवेश्वर अशा विशेषणांनी ते सुप्रसिद्ध झाले.
कायक वे कैलास- सर्व प्रकारच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारे अनुभव मट्पाची – संकल्पना आणि स्थापना करणारे दासोट- म्हणजे दान करण्यासाठी प्रेरित करणारे बसवेश्वर – महात्मा बसवेश्वर म्हणून हळूहळू देश विदेशातही प्रभावी बिनले.
शिवाची आराधना करणारा लिंगायत, शतकातील पहिली लोकशाही संसदेची अनुभव मटपची स्थापना केली. तर त्यांनी १२ व्या शतकातील महिलांना समान दर्जा शिक्षण देण्याचे धाडस केले.मलप्रथा, घटप्रभा, कृष्णा या तीन नद्यांच्या संगमावरती कुडलसंगम येथे समाधी घेतली.
महात्मा बसवेश्वरांना जन्मावर आधारित जातिभेद, लिंगभेद मान्य नव्हते, कर्म हेच मानवाचे परमकर्तव्य आहे असे ते सांगत. “कायक वे कैलास “हे त्यांच्या तत्वज्ञानाचे सार होते. श्रमातून कैलासाकडे हे तंत्र ज्यांना ज्यांना पटले त्यांनी या धर्माची दिक्षा घेतली.
लेखिका
*सौ.रेखा कोरे*
खोपोली, जि.रायगड.