You are currently viewing १० मे रोजी मुणगे येथील देवी भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा

१० मे रोजी मुणगे येथील देवी भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा

देवगड :

 

देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वा. वसंतपुष्प शैक्षणिक सामाजिक महिला उत्कर्ष संस्था भांडूप मुंबई तर्फे चित्रकला स्पर्धा, दुपारी ३.३० वा. श्री देवी भगवतीचे माहेर घरी (पाडावे बंधूंच्या घरी) देवालयातुन प्रस्थान, संध्या ५.०० वा. श्री देवी भगवती माहेर घरी आगमन, संध्या ७.०० वा. श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ सावंतवाडी, मुणगे यांचे सुश्राव्य भजन, संध्या ७.३० वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. प्रकाश पा. लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे (डोंबिवली प.) यांचा पौराणिक दशावतारी नाट्य पुष्प “पुण्याई जन्माची”.

११ मे रोजी सकाळी ७.०० वा. श्री देवी भगवतीची ओटी भरणे व दर्शन, दुपारी १२.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. श्री देवी भगवतीचे मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.  १३ मे २०२४ सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, संध्या ४.०० ते ६.०० हळदी कुंकू समारंभ, रात्रौ ७.०० वा. आरती व तीर्थ प्रसाद, रात्रौ ९.३० वा. आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना (२० x २०) डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आजिवली, सोनारवाडी बुवा श्री. प्रविण सुतार विरुद्ध श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोस खुर्द बुवा श्री. ज्ञानदेव मेस्त्री यांच्यात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पाडावे बंधु मुणगे, कारिवणेवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा