देवगड:
देवगड तालुक्यातल्या चौ-यांऐंशी खेड्यांचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामदार श्री देव सिद्धेश्वर देवालयाचा शनिवार ११ मे रोजी वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता इनामदार श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई देवालयात लघुरुद्र व बारा स्थळातील देव- देवतांवर अभिषेक , दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक सुस्वर भजने, रात्री १० वाजता निगुर्डे ( सावंतवाडी ) येथील दशावतार मंडळाचा ‘शिव अघोरी संग्राम’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी, बारा – पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळीनी कळविले आहे.