*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाती*
स्त्री असते
कुणाची कन्या
कुणाची माता
कुणाची पत्नी
कुणाची मामी ,मावशी
कुणाची बहिण, वहिनी
कुणाची नणंद,पुतणी
कुणाची आत्या,आजी
कुणाची नात,भाची
तर कुणाची विद्यार्थींनी
कुणाची शिक्षिका
एवढी सारी नाती
निभावते स्त्री
तरीही परावलंबी कशी ?
म्हणून स्त्रीने व्हावं
स्वयंसिद्धा , योध्दा
नेता, सेनापती
पंतप्रधान, राष्ट्रपती
स्त्रीने निवडावीत
हिही नाती
खंबीरपणे
*कवयित्री*
*अनुपमा जाधव*
*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*