You are currently viewing काव्यपुष्प-७७ वे

काव्यपुष्प-७७ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-७७ वे*

—————————————–

श्रीगोंदवले प्रसिद्ध झाले । इथे लोकांचे येणे वाढले ।

अनेक जण साधक झाले । शिष्य झाले महाराजांचे ।।१ ।।

 

जो जो मंदिरी येई । भगवंत नाम घेई । त्या सर्वांना देई ।

नाम मुक्तपणे श्रीमहाराज ।। २ ।।

 

दर्शनास जो आला । मिळे त्यास पोटभर खाण्याला ।

चाले अन्नछत्र गोंदवल्याला । श्रीराम मंदिरी ।। ३ ।।

 

कितीही होवो दाटी । भात, भाकरी, आमटी । प्रसाद हा

सर्वांना वाटी । श्रीमहाराज ।। ४ ।।

 

अन्न बुद्धी तयार करते । प्रसाद खाता बुद्धी शुद्ध होते ।

हेची सदा सांगते । श्रीमहाराज ।। ५ ।।

 

श्रीमहाराजानी एक केले । उत्सव, सप्ताह नित्य सुरू केले।

भजन कीर्तन सुरू झाले । श्रीराम मंदिरी ।।६ ।।

 

जय जय श्रीराम ,जय जय श्रीराम । हे एकच नाम ।

करतांना हर काम । घेऊ लागले सारे जन ।। ७ ।।

—————————————–

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास,

—————————————–

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-७७ वे

कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा