*ज्येष्ठ चित्रकार लेखिका कवयित्री स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हसून जिंकतो मी!*
🌹🌹🌹🌹🌹🌹
हसून जिंकतो मी,
रडणाऱ्या दुःखास सार्या
पळवून लावतो मी
मिटवितो विवंचना सार्या
💐
दुःखाच्याच वाटेवरी
सापडले ते सुख मजला,
घेतले गोंजारुनि कुशीत
घोर नको हा जीवाला.
🪷
महत्वाकांक्षेचा डोलारा
भिरकावून दूर दिधला,
तेथेच सुखाचा कवडसा
हळूच माझ्याशी हसला.
🌷
मनाचा उभारुनि पिसारा
सोडूनि त्या शंकाकुशंका
मनास धीर दिधला, घे
भरारी,जाळुनि दुःखलंका
🌹
हे सुखद क्षण जीवनाचे
गुंफुनि गोंजारितो मी,
सुगंध तयाचा भरभरुनि
हृदयकोंदणी साठवितोमी
🪷
आता उणे न काही,सारे
बेरीजजमा,भरलीशिदोरी
मनमुराद जगलो,हसलो
भरुनि वाहे ,सुखतिजोरी
🌹
अपेक्षांचे ओझे थांबवुनि
वेळीच आवरले स्वतः स,
चिंतेची वळकटीगुंडाळुनि
फेकिली,गोंजारलेसुखास
🌷
आता यावेकधीही निवांत
मृत्यूनेलवाजाम्यासहशांत
यावयातुझ्यासवेआनंदात
मी निरपेक्ष हसत निवांत
💐💐💐💐💐💐
स्वप्नगंधा सतीश
आंबेतकर
मुंबई विरार