You are currently viewing कारने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

कारने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

कारने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी – मांजरेकरवाडी येथे अपघात

सावंतवाडी

कुडाळ येथून गोव्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. झाराप पत्रादेवी बायपास मळगाव जोशी वाडी सर्कल लगत हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद सरमळकर (५६, रा. कुडाळ ) असे त्यांचे नाव आहे.

शरद सरमळकर हे कुडाळ येथून आपल्या ताब्यातील टिव्हीएस वेगो दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात होते. झाराप पत्रादेवी बायपास वरून जात असताना मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे आले असताना पाठीमागून येणाऱ्या स्वीफ्ट कारची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात ते गाडीवरून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनिकेत राणे असे कार चालकाचे नाव असून तो कणकवली येथील आहे. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कार चालक व कार मधील प्रवासी सुखरूप बचावले.

अपघाताची माहिती मिळताच मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, संजय जोशी, दीपक जोशी, बाळा आरविंदेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर हनुमंत पेडणेकर यांनी रुग्णवाहिका मागवून जखमी सरमळकर यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. यासाठी माजी सभापती राजू परब यांनीही सहकार्य केले. दरम्यान, हा अपघात घडल्याने तिथे थांबलेल्या निलेश मांजरेकर या स्थानिक युवकाला दुसऱ्या गाडीची धडक बसली

प्रतिक्रिया व्यक्त करा