You are currently viewing आचरा देवगड मार्गावर रिक्षा व खाजगी आराम बसमध्ये ‌‌झालेल्या अपघातात नऊ वर्षाचा मुलगा गंभीर  

आचरा देवगड मार्गावर रिक्षा व खाजगी आराम बसमध्ये ‌‌झालेल्या अपघातात नऊ वर्षाचा मुलगा गंभीर  

आचरा देवगड मार्गावर रिक्षा व खाजगी आराम बसमध्ये ‌‌झालेल्या अपघातात नऊ वर्षाचा मुलगा गंभीर

मालवण

आचरा देवगड रस्त्यावर मशवी गावाव्हाळ येथील अवघड वाळणावर खाजगी बसने दहिबावच्या दिशेने जाणाऱ्या रीक्षेला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला ही धडक एवढी जोरात होती की रिक्षेमध्ये उजव्या बाजूस बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा उजवा पायांचे दोन तुकडे झालेत. रिक्षातील मुलाचे आईवडीलही जखमी झालेत. अपघात झाल्यावर जखमीना आचरा रुग्णालयात हालवण्यात आले होते. अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. या अपघात झाल्याचे समजल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस विजय बिर्जे, सागर चौगले घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातात रिक्षामधील रुद्र लवू घाडी वय 9, लवू धोंडू घाडी वय 45, रुचिता लवू घाडी 40 रा सर्व दहिबाव हे गंभीर जखमी झालेत. तर रिक्षा चालक रिक्षा वसंत गोविंद परब रा पोईप यांना किरकोळ दुखापत झाली.

दहिबाव येथील लवू घाडी हे आपल्या कुटूंबासमवेत पत्नीच्या माहेरी मालडी येथे काही दिवसापूर्वी गेले होते. ते मालडी येथून बुधवारी सकाळी आचरा मार्गे देवगड- दहीबांव येथे पोईप येथील रिक्षाने मालडी येथून पत्नी रुचिता व मुलगा रुद्र यांच्या समवेत जात होते.

सकाळी साडेनऊच्या सुमारास आचरा देवगड रस्त्यावर माशवी गावव्हाळ येथील अवघड वाळणावर आले असता समोरून आचराच्या दिशेने येणाऱ्या आराम बसने(आराम बस नंबर MH04 GP. 1875) रिक्षेच्या (रिक्षा नंबर MHO7 F 2115) उजव्या बाजूला जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की काही अंतर रिक्षा फरफटत जाऊन कलंडली. धडकेत उजव्या बाजूला बसलेला रुद्र घाडी याचा उजवा पाय रिक्षा आणि आरामबसचा भागात सापडल्याने पायाचे दोन तुकडे झालेत. तर रिक्षातील लवू घाडी व रुचिता यांनाही डोक्याला व कानाच्या मागे गंभीर दुखापती झाल्या. अपघाता नंतर अरामबस चालकाने बस तेथेच टाकून पसार झाला होता. रस्त्याने येणाऱ्या प्रवाशी व स्थानिकांनी जखमीना उपचारासाठी आचरा आरोग्य केंद्रात हलवले होते. अपघात झाल्याचे समजल्यानंतर स्थानिक व दहिबाव येथील ग्रामस्थ जमा झाले होते फरार झालेल्या चालकाला पकडून आणण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पोलिसांकडे लावून धरली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा