*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि.देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
चला हो शरण समर्था जाऊ …
————————————————-
जीवनाचे सार जाणुनी घेऊ
चला हो शरण समर्था जाऊ ।।
मन भरण्या करितो चाकरी
खळगी भरण्या लागे भाकरी
रहाटगाडगे विसरुनी जाऊ
चला हो शरण समर्था जाऊ ।।
दु:खात रडतो ,सुखात हसतो
खोट्या खोट्या स्वप्नात रमतो
या भ्रमातुनी बाहेर येऊ
चला हो शरण समर्था जाऊ ।।
अज्ञानाचे पटल गडद , तरी
डोळे आमुचे उघडत नाही
अंजन ते ज्ञानाचे लावून घेऊ
चला हो शरण समर्था जाऊ ।।
————————————————-
चला हो शरण समर्था जाऊ
-अरुण वि.देशपांडे -पुणे .