मिरज :
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज संपले. मतदानाची टक्केवारी पाहिली असता अशावेळी मिरज (सांगली) येथील आयुष्याचे शतक पार केलेल्या आजिबाई इंदिरा शिवराम भट (१०४) यांनी आपल्या मुलीसोबत कन्याशाळा मिरज येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. ४ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी वयाची १०४ वर्षे पूर्ण केली.
इंदिरा भट यांचा वयाच्या १०४ वर्षी सुद्धा मतदान करण्याचा दांडगा उत्साह नक्कीच कौतुकास्पद आहे, आणि मतदाना सारखा पवित्र हक्क बजावणे टाळणाऱ्यांसाठी एक सबक आहे. आजकाल मतदारांना पैसे वाटप होणे, घरी येऊन गाडीने घेऊन जाणे असे प्रकार होत असताना मात्र आजीबाईंना मतदानासाठी न्यायला कोणीही आले नाही परंतु म्हणून त्यांचा मतदान करण्याचा निश्चय बदलला नाही.