You are currently viewing भालावल येथे अर्चना घारे परब यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

भालावल येथे अर्चना घारे परब यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

सावंतवाडी :

 

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आपल्या माहेरी भालावल गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सहकुटुंबीय मतदान केले. यावेळी पती संदीप घारे, विनायक परब, सिद्धी परब, वैभव परब, ऋतिक परब, रजनी गवस यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सौ. घारे म्हणाल्या, इंडिया आघाडीला सावंतवाडी विधानसभा मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हॅट्रिक करतील असा विश्वास अर्चना घारे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा