You are currently viewing किरण सामंत नॉट रिचेबल..

किरण सामंत नॉट रिचेबल..

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम 

सिंधुदुर्ग :

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात आज मतदान होत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत. किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी सामंत बंधूंनी शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला होता. मात्र, शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पारड्यात दान टाकल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत महायुतीचा धर्म पाळत कामाला लागले होते. परंतु, आता सर्वकाही सुरळीत सुरु असताना ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. किरण सामंत यांच्या एका भूमिकेने रत्नागिरीतील राजकीय समीकरणं आणि मतदानाचा पॅटर्न १८० अंशाच्या कोनात फिरू शकतो. त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा