महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी बजावला मतदानाचा हक्क
वरवडे -फणसनगर येथील शाळेत केले मतदान
कणकवली
महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. निलम राणे, स्नुषा सौ. प्रियांका निलेश राणे, भाऊ अशोक राणे यांनीही मतदान केले. तसेच सौ. नंदिता नितेश राणे यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा व सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन श्री राणे यांनी यावेळी केले.