*उबाठानेच पैसे वाटल्याचे लोकांचे म्हणणे; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा आरोप*
सावंतवाडी :
आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आम्ही आमदारांच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. कोकणी माणूस कधीही लाचार होणार नाही. मी कोणाकडूनही एक रुपया देखील घेतला नाही. मी साईबाबांना माननारा माणूस आहे. माझ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहे. ५० खोके काय मी ५ रूपये सुद्धा कोणाचे घेतले नाहीत. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही शिर्डीला साईबाबांसमोर या व बोला.
वर्षा बाहेर तासनतास उभा रहाणारा मी नाही. आमदारांचा सातत्याने अपमान होत असल्यानेच आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलो. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका व उगाच कुणाला बदनाम करायची हिंमत करू नका. अन्यथा सगळं बाहेर काढावं लागेल.
मागच्यावेळी समोरील उमेदवाराचा अर्ज बाद झाला अन्यथा आज चित्र वेगळं असतं. मी त्यावेळी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेमुळेच तुम्ही निवडून आलात हे विसरू नका. उगाच माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत मला तुमच्या मतदारसंघात यावं लागेल.
आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ए, बी.सी कॅटॅगरी करून पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, कुणी पैसे वाटले याची आपल्याला कल्पना नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी एकलाही पैसै वाटले नाहीत. जर पैसे वाटले गेले तर वैभव नाईक यांनी ते रोखलं का नाही ? उलट उबाठा शिवसेनेनेच पैसै वाटले असं लोक सांगत आहेत वैभव नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असा सणसणीत इशारा देत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वैभव नाईकांच्या टीकेला पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.