वेंगुर्ला :
आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, कै.हिराबाई नारायण प्रभूझांटये नेत्र रूग्णालय व गांवधडवाडी मित्रमंडळ आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रात होणाया या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अमित आजगांवकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ.अभिज्ञा आजगांवकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अश्विनी आजगांवकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.प्रग्या पोरवाल यांच्यासह डॉ.धृती आजगांवकर, डॉ.जयप्रकाश पेडणेकर, डॉ.विनायक सावर्डेकर, डॉ.ओंकार खांडेकर व डॉ.प्रदिप येसाजी आदी डॉक्टर उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णांची रक्त, एक्स-रे, ई.सी.जी. तपासणी मोफत केली जाईल. शिबिरास येताना रूग्णांनी आपले जुने रिपोर्टस् व औषधे बरोबर आणावीत. अधिक माहितीसाठी आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र (०२३६६) २२७२३२ किवा ९८२३४३५५०२ यावर संफ साधावा.