*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। जय गजानन । गण गण गणात बोते ।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ४४ वे
अध्याय – ८ वा , कविता – १ ली
—————————————-
श्री गणेशाय नमा : । श्री कुलदेवी- श्री कुलदेवता नमा: ।
श्री सद्गुरुवे नमा: । वंदन सर्वांना कवी अरुणदासाचे ।।१ ।।
प्रथम ते सप्तम अध्याय आरंभीचे । यातुनी जाणिले साचे। सार उपदेशांचे । स्वामी शब्द कल्याणाचे ।। २ ।।
अध्याय आरंभ आठवा । कथा भाग अनुभवावा । जाणुनी घ्यावा । भाव स्वामींच्या मनीचा ।। ३ ।।
पाटील-देशमुख मंडळी । बलवान, धनवान मंडळी ।
द्वेषापायी यांच्यात दुफळी । असे सदाची ।। ४ ।।
समाजाचे यात नुकसान । याचे ठेवावे भान । व्यर्थ असे
फुकाचे मान । वैर-भावना नसावी मनात ।। ५ ।।
पाटलांच्या शब्दांना धुडकावणे । देशमुखांच्या चाकराचे
बेबंद वागणे । पाटलाला अपमानित करणे । या कारणे
पाटलास क्रोधीत करणे । । ६ ।।
देशमुखांनी डाव हा टाकला । हेतू साध्य त्यांचा झाला ।
चाकराचा उपयोग केला । अडचणीत आणण्या पाटलास ।। ७ ।।
देशमुखांच्या या कुरापती । करुनि नाना उचापती ।
आणिली घोर आपत्ती । खंडू पाटलावरी ।। ८ ।।
अब्रू पाटलांची धोक्यात । बे-इज्जतीची भीती मनात ।
पाणी येई डोळ्यात । पाटील जाई शरण गजानाना ।। ९ ।।
—————————————–
क्रमशः
-कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे
—————————————–