*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सर्वश्रेष्ठ दान*
रक्तदान म्हणजे
द्यावे जीवनदान
ज्यामुळे वाचतात
मानवाचे प्राण।।
आजार अपघात
होतात अकस्मात
रक्ताची त्यावेळी
पडते ददात।।
योग्य रक्तगटाचे
रक्त मिळता
रुग्णांना दिलासा
लाभे जीवनदाता।।
जातीधर्मापल्याड
रक्ताचे आहे महत्त्व
शरीरातच होते निर्मिती
जाणा गंभीरपणे तत्त्व।।
रक्तदान शिबिरे
सामाजिक संस्था घेतात
जनतेचे प्रबोधन
जनजागृती करतात।।
निरोगी व्यक्तीने
करावे रक्तदान नियमित
प्राणदान देण्याचे
पुण्य होते फलीत….।।
~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार
दिग्रस यवतमाळ