विनायक राऊत चा पराभव दिसत असल्यानेच शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी प्रचाराकडे फिरवली पाठ
*डॉ स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत कडून होणाऱ्या छळाची नीलम गोऱ्हेनकडे केली तक्रार ;
*येत्या 5 वर्षांत रोजगार निर्मितीला राणे साहेब देणार प्राधान्य
कणकवली :
डॉ स्वप्ना पाटकर यांनी नीलम गोऱ्हे यांची भेट घेत संजय राजाराम राऊत छळ करत असून आपल्या मागे माणसं लावल्याची तक्रार केली आहे.दोन पानी पत्रात डॉ पाटकर यांनी संजय राऊत कडून आपल्याला होत असलेल्या छळाचा पाढाच वाचला आहे. येत्या अधिवेशनात याबाबत आपण आवाज उठवणार आहे. पोलिसांनी पण याची दखल घ्यावी.चंबळ च्या डाकू सारखा संजय राऊत असल्याचा घणाघात भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला.छत्रपती शिवरायांनी जसे मोगलांपासून माता भगिनींना वाचवले तसेच मागील 10 वर्षांत मोदींच्या काळात देशात माताभगिनींचे रक्षण केले.औरंग्यांच्या बाजूला आणखी 2 खड्डे खणले आहेत. 4 जून ला या खड्ड्यात संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला घालणार असल्याचा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. राणे साहेबांनी काय दिवे लावले हे पहायचे असेल तर प्रचाराला कोकणात संजय राऊत तू येशील असे वाटले होते. आला असतास तर एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट केला असता. विनायक राऊत च्या प्रचाराला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वगळता महाविकास आघाडी चा एकही नेता का आला नाही ? शरद पवार राज्यात फिरताहेत मग कोकणात का आले नाही ? काँग्रेस चे नाना पटोले,किंवा थोरात,वडेट्टीवार याना माहितीय की 4 जून ला राऊत घरी बसनार आहे. पेंग्विन ला इकडे कितीही नाचवा, फावड्याला इथे कितीही फावडे मारू द्या 4 जून ला विजय हा महायुती चाच असणार आहे. तोडपाणी करण्याची सवय उद्धव ठाकरे ला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रचलेल्या कटाबाबत मोहित कमबोज यांनी ट्विट केले आहे याबाबत बोलताना नितेश म्हणाले की मोहित कमबोज यांची यंत्रणा सीबीआय सारखी आहे. त्यांच्याकडे पेन ड्राइव्ह चा मोठा साठा आहे. आगे आगे देखो होता है क्या ? असा सूचक इशाराही नितेश राणे यांनी दिला. पाणबुडी प्रकल्प गुजरातला का गेला याचा हिशोब माजी पर्यटन मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे ने द्यायला हवा. गोव्यात मौजमजा करायला चुलत भावासह येत होतास तेव्हा सिंधुदुर्गात का आला नाहीस ? असा रोकडा सवाल नितेश राणे यांनी विचारला. येत्या 5 वर्षांत तरुणांना रोजगार देण्याकडे आमचा भर आहे.रोजगार निर्मिती हेच आमचे ध्येय असणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले.