You are currently viewing एक दिवस = पाच वर्षे

एक दिवस = पाच वर्षे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक दिवस = पाच वर्षे*

सावधान मतदार राजा 

 

पंचवार्षिक एक दिवस खरा

तू उत्सवमूर्ती राजा मतदारा |

दाता तू मतदार दानी जो थोर

पारख हवी दान देता न घोर ||१||

प्रत्येक तुज आज ये मूल्य बहु

सावध, तुज येती तोलण्या बहु |

काय हवे माग म्हणती का बहु

क्षणाचे परि तुज ये मूल्य बहु ||२||

जाग जाग रे दानवीरा उदारा

कोण कोण रे मता करिती धावा |

की काळजी भावभोळ्या संसारांची

अथवा माडी इमल्यासाठी धावा ||३||

हो ज्ञानी आठव इतिहास सत्य

कसे, कुणा, का द्यावे दान अगत्य |

राजा हरिश्चंद्र श्रेष्ठ दानी तरी

दान दे दक्षिणे कै उरले तरी ||४||

विवेकाच्या कोंदणातला तो हिरा

फक्त एक दिवस नव्हे तो क्षण |

पाच वर्षांचं वर्चस्व अधिराज्य

एका क्षणात दानात गेले धन ||५||

तुमचे राज्य तुमचे सुविचार

निःस्वार्थी जनसेवारति जे थोर |

त्यांच्या हाती दे मतदानाचे वाण

ज्यांना जन सुखशांतीची हो जाण ||६||

दावण्या आली वेळ तुम्हा ही आता

ना लायकीचे बळ पाठी जयाशी |

ना कृती ती समाज साध्य हिताची

कुपात्र नर-नारी राजकारणाशी ||७||

दे दान मतदान राज सत्यास

जया मनी दया भाव मानवता |

निःस्वार्थ समाज राजकारणास

समर्पिले स्वतःस ते जनहिता ||८||

सावधान

अमूल्य परि मौल्यवान मत हे

धना दे क्षण सुखा वडापावाते |

सहस्र पंचगुणा धन लाभेल

लाभेलही लाख न सत्य तरी ते ||९||

विकले जाण्यास नसे मतदार

खरा तो लोकराज्याचा शिल्पकार |

ते एक मत ठरे राज्यालंकार

दे अचूक मतदान मतदार ||१०||

बकरा बाटलीच्या न जावे वाटे

दानाचे राज्य घालवती जुगारी |

न क्रोध करी सुजन सुविचारी

सद्य स्थिती जे पारखती ते भारी ||११||

एक दिवस क्षण मतदाराचा

तेव्हा तोच उदार राजाचा मान |

मत दाता ठरे राजा हरिश्चंद्र

अथवा राज्य त्यागी हर्षवर्धन ||१२||

आता ऐसी ये अवस्था ती वल्कले

जावे नेसून वना की कष्टी जिणे |

भिकार्‍यास मागता ये भीक बरे

दानशूरा न उरे भीक मागणे ||१३||

असा एक विक्रमादित्य ये जन्मा

समर्थ समाजा देशास तारील |

अयोग्य उमेदवारा हरविल

मतदानास सार्थच जो करील ||१४||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली.

प्रतिक्रिया व्यक्त करा