*विकासाचे व्हिजन; सावंतवाडीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद*
सावंतवाडी :
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंत्री दीपक केसरकर हे आता शहरातील प्रचारात ऑन फिल्ड उतरले आहेत. सध्या ते व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत.
मतदार संघातील जनतेशी संवाद साधल्यानंतर, शनिवारी सावंतवाडी शहरातील व्यापाऱ्यांशी केसरकर यांनी संवाद साधला.
नारायण राणे यांच्या विजयासाठी गेले काही दिवस जोरदार प्रचार करणाऱ्या केसरकर यांना होम पीच वर सावंतवाडी शहरात सर्वाधिक मते मिळावीत अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुधन्वा आरेकर, संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, किर्ती बोंद्रे, परिक्षीत मांजरेकर, प्रतिक बांदेकर, बंटी पुरोहित, देव्या सुर्याजी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, संदीप निवळे, वर्धन पोकळे, अर्चित पोकळे, सुरज मठकर, माधुरी वाडकर, नंदू शिरोडकर, प्रथमेश कुडतरकर, सुनील नाईक, महेश सुकी, शुभांगी सुकी, दत्ता सावंत, सुकन्या टोपले, देवेन पडते, क्षीप्रा सावंत आदींसह मोठ्या संख्येने महिला तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.