You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचा पुणे येथील तिसरा साहित्यिक मेळावा पार पडला उत्साहात..!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचा पुणे येथील तिसरा साहित्यिक मेळावा पार पडला उत्साहात..!

*साहित्यिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया लक्षवेधी..!*

साकव्य पुणे विभागाने २८ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केलेला तिसरा साहित्यिक मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. श्री. नंदकिशोर बोधाई यांनी यांचे सर्व आयोजन केले होते. वारजे हायवे परिसर जेष्ठ नागरिक संघ हाॅल, शिप्ला फाउंडेशन जवळ, पुणे बंगळूर हायवे, पुणे येथे संपन्न झाला.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भूषविले. प्रा.नंदकिशोर बोधाई यांनी प्रास्ताविक केले. श्री. सुहास सांबरेनी स्वागत केले. श्री. शरद जतकर यांनी ईशस्तवन केले. आघाडीच्या कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांनी अत्यंत प्रभावीपणे बहारदार सूत्रसंचालन केले.
या संमेलनात २५ कवी, कवयित्री यांनी काव्यसंमेलन गाजवले. यामध्ये चंद्रशेखर धर्माधिकारी, राजश्री सोले, कीर्ति देसाई, मेघना आगवेकर, गणपत तरंगे, उषा फाल्गुने, सारिका सासवडे, किसन म्हसे, विजय जाधव, बाळकृष्ण अमृतकर, विनया साठे, नंदिनी चांदवले , हेमांगी बोंडे, शोभा जुमडे, अनघा कुलकर्णी, उमा व्यास, डि.के जोशी, नंदकिशोर बोधाई, ज्योत्स्ना तानवडे आदिंनी काव्यसंमेलन गाजवले. प्रिया दामले यांनी ‘वहातो ही दूर्वाची जुडी’ मधील काव्य सादर करुन संमेलनाची रंगत वाढवली.
प्रा.नंदकिशोर बोधाई, सुहास सांबरे, चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्योत्स्ना तानवडे यांच्या विशेष सक्रीय पुढाकारातून संमेलन अपेक्षेपेक्षाही यशस्वी झाले.

संमेलनात साहित्य आणि सामाजिक बांधिलकी या महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. काही सूचना, प्रस्ताव मांडले गेले. दर ३ महिन्यांनी असा मेळावा घ्यावा, समुहात १ आणि १५ अशा ठराविक तारखांना काव्य स्पर्धा घ्याव्यात, या साहित्यिक वाटचालीत जास्तीत जास्त तरूणांना सहभागी करून घ्यावे अशा खूप चांगल्या सूचना आल्या आहेत.

संमेलनाचे औचित्य साधून संमेलनाध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित *डहाळी विशेषांक* संमेलनातील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच कीर्ति देसाई यांचा *’ स्वरसुगंध ‘* हा स्वरचित गीतांचा संग्रह डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी एक विडंबन गीत, सुहास सांबरेनी एक गीत सादर केले. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

समारोपात संमेलनाध्यक्ष डाॅ.घाणेकर यांनी त्यांच्या डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विश्वपीठातर्फे, ‘साकव्य’ चे संस्थापक आणि अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी यांना २०२४ चा ‘साहित्य जीवन गौरव’ पुरस्कार जाहिर केला. अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी अध्यक्षीय भाषणात खूप छान मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाचा हा थोडक्यात गोषवारा !

जगा मुक्तपणे लिहा मुक्तपणे
———————————-
डाॅ.मधुसूदन घाणेकर
“साहित्य, अध्यात्म, संगीत, चित्रपट, गायन, चित्रकला, क्रिडा,नृत्य, पेंटिंग, राजकारण , समाजकारण, सुरक्षा, संशोधन, संपादन आदि कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ति असो तिच्यात प्रतिभा असते.

साहित्यिक म्हटल्यावर केवळ साहित्यापुरते आपले क्षेत्र मर्यादित ठेवता कामा नये. आपली पंचज्ञानेंद्रिये जागरुक ठेवली पाहिजेत. भोवतालच्या बदलत्या जगाविषयी सजगता पाहिजे. आपण मुक्तपणे गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, सर्वत्र समाजात निखळपणे मिसळले पाहिजे. विविध क्षेत्रातील यशस्वितांचे जगणे जाणून घेतले पाहिजे. स्वतः सर्वत्र व्यक्त होताना दुस-यातील सदगुणांनाही दाद द्या. भरपूर वाचा. चिंतन मनन करा. यातून आपल्या अनुभूतिंचा परिघ रुंदावत जाऊन प्रगल्भ..शाश्वत साहित्याची निर्मिती होऊन माऊलींची विश्वकल्याणाणाची संकल्पना साकारण्यास निश्चितच हातभार लागू शकता.
भारतीय अध्यात्माची बैठक असलेल्या साहित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लिहा. उच्च आदर्शवादांचे आचरण करुन आपले साहित्यिक जीवन समृध्द करा.” या अध्यक्षीय भाषणाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकंदरीत सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात, हसतखेळत पार पडले.

या संमेलनात सहभागी झालेल्या काही सदस्यांनी खूप बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

🍂🍃🌼🍃🍂
उत्तम नियोजन, उत्तम निवेदन व सर्व कविवर्यांचे हटके सादरीकरण… माननीय अध्यक्षांचे दिलखेचक गीत धून व प्रोत्साहनपर भाषण …एकूण सर्वच साकव्यचा वारजे पुणे विभाग आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रम लक्ष्यवेधी ठरला …. खानपान व्यवस्था वेळेत व मुबलक झाली …श्री.बोधाई सर, ज्योत्स्नाताई, धर्माधिकारीसर,सांबरे सर यांचे विशेष आभार…जतकर सरांच्या गीत गायनाने व कीर्ती ताईंच्या पसायदानाने कार्यक्रमाला लज्जत आली.. — मेघना आगवेकर 💐🙏💐

🌼🌻🌼 ज्योत्स्नाताईंचे निवेदन छानच झाले. सर्वांचे सादरीकरण वेळेत आणि उत्तम झाले‌. पसायदान पण गोड वाटले. सांबरे सरांनी सावरकरांवर माहितीपूर्ण तेजपर्व दिनदर्शिका दिली, खूप छान आहे.

एकंदरीत कार्यक्रम खूप चांगला झाला, काहीजणांच्या ओळखी झाल्या तर काहीजणांच्या ओळखी वाढल्या. श्री घाणेकर सरांचे भाषण अप्रतिम! साकव्य चे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻. अनघा कुलकर्णी 💐🙏💐

🌼🌻🌼 साकव्य स्नेहमेळावा खूप छान झाला. अध्यक्षांचे भाषण, ज्योत्स्नाताईंचे निवेदन, बोधाई सरांचे प्रास्तविक आणि सर्वांचे सादरीकरण सर्वच कार्यक्रम अप्रतिम झाला. मध्यंतरात चहा, डीशने कार्यक्रमाची रंगत वाढली. राजश्री सोले💐🙏💐

🌼🌻🌼 साकव्य पुणे विभाग मेळावा आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कवितांचे सादरीकरण आणि रंगतदार भाषणे हे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. मला कार्यक्रमात पसायदान गाण्याची आणि कविता सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल मान्यवरांचे खूप खूप आभार!. “जेही काम आवडतं ते मनापासून करा आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.” हा मौल्यवान विचार मान्यवरांकडून घेऊन आम्ही बाहेर पडलो. कीर्ती देसाई 💐🙏💐

🌼🌻🌼. आज माझा साकव्य मधील पाहिला दिवस होता. मी फक्त ईशस्तवन करून जाणार होतो. कारण मी कवी नाही. मग कविता सादर करणं वगैरे माझा प्रांत नव्हता. परंतु जसजसा कार्यक्रम रंगत गेला तसतसा मी यात गुंतत गेलो. आणि शेवट पर्यंत या कार्यक्रमाचा आनंद घेत राहिलो. साकव्यचा एक भाग होऊन परतलो. अनेक मित्र जोडले गेले. सर्वांना धन्यवाद ! शरद जतकर 💐🙏💐

🌼🌻🌼 साकव्यची आजची सोबत मला माझ्यातल्या ‘मी’ ला भेटायला कारणीभूत ठरली। माझ्या शोधाला काही तरी सापडले। शोभा जुमडे.💐🙏💐

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे साकव्य मेळावा सदस्य.

प्रतिक्रिया व्यक्त करा