*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्गाची शाळा*
निसर्गाची शाळा भरली
निसर्गाची शाळा.
इथे नाही मास्तर बाई
इथे नाही फळा.
हिरव्या हिरव्या शाळेत
सगळे हिरवेगार.
इथे नाही पुस्तक पाटी
इथे नाही मार.
इथे आहेत फुलाफुलांनी
बहरलेली झाडे.
फांद्यांवरती गाणारे
पक्षी आभाळवेडे
हत्तीदादा व्यायामाची
इथे शाळा घेतात.
संकटातून कसं करायचं
याचं शिक्षण देतात.
जिराफ सांगतो जगात या
ताठ मानेने जगा.
घोडा म्हणतो शक्ती कशी
कमवावी ते शिका.
झाड शिकवतं
सावली दे.
फूल शिकवतं
सुगंध दे.
अनुपमा जाधव.