*लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे-रिपब्लिकन पार्टी- रासप, महायुतीचे उमेदवार श्री.नारायण राणे साहेब यांच्या साठी धनगर समाज भटके विमुक्त जाती जमातीच्या वाडीवस्तीवर जाऊन प्रचार सुरू.*
*भाजपा भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रचारात आघाडी.*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब व शालेय शिक्षण मंत्री दिपक भाई केसरकर साहेब यांच्या होम पीच वरून राणे साहेब यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी भटके विमुक्त जाती जमाती समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा विकास कामाची हमी आम्ही देतो – भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे*
*सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व भटके विमुक्त जाती जमातीतील समाज बांधवांचा नारायण राणे साहेब यांच्याच पाठीशी – भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी विधान सभा प्रभारी भरत गोरे*
*सावंतवाडी-*
दिनांक.02 मे 2024.सरमाळे सितपवाडी धनगर वस्ती येथे झालेल्या भाजपा-🏹शिवसेना-🕐राष्ट्रवादी काँग्रेस-🚆मनसे-💜रिपब्लिकन पार्टी- 🇬🇫रासप, महायुतीचे उमेदवार श्री.नारायण राणे यांच्या प्रचार बैठकीत भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी महायुती ला का मतदान करायचे याबाबत माहिती दिली. केंद्राच्या योजना तळागाळात पोचवण्यासाठी विद्यमान खासदार विनायक राऊत अपयशी ठरले असून आता आपल्याला आपल्यासाठी काम करणारा आपल्या घरातील उमेदवार सन्माननीय राणेसाहेबांना निवडून द्यायचे आहे त्याकरता 07 मे 2024 रोजी कमळ चिन्ह समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे. ज्यावेळी तुम्ही कमळावर ती बटन दाबाल त्यावेळी देशाचे सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी यांना एक मत जाईल जेव्हा तुम्ही कमळाला बटन दाबाल तेव्हा या कोकणचे भाग्यविधाते कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास असणारे अष्टपैलू कार्यसम्राट उमेदवार नारायण राणे साहेबांना मतदान जाईल. कमळाला केलेल्या मतदान हे कधीही फुकट जाणार नाही आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर तुमची सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते कटिबद्ध राहणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर,माजी खासदार निलेशजी राणे साहेब, आमदार नितेशजी राणीसाहेब विधानसभा प्रमुख सावंतवाडी माजी आमदार राजन तेली साहेब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब, व आम्ही सर्व आपली विकास कामे आतापर्यंत करत आलो आहोत यापुढेही करत राहू असा विश्वास श्री काळे यांनी मतदारांना दिला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष कोकण प्रांत अध्यक्ष मयेकर मॅडम यांनी देखील उपस्थित मतदारांना मार्गदर्शन केले. महायुतीमध्ये आमच्या पक्षाला उमेदवारी देऊन पक्षाचा सन्मान वाढवल्याबद्दल आणि धनगर समाजाच्या नेतृत्व जानकर साहेबांना संधी दिल्याबद्दल माहितीच्या सर्व नेत्यांची त्यांनी आभार मानले. भारतीय जनता पार्टी सोबत रासप ही आपल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे त्यांनी अभिवचन उपस्थित मतदारांना दिले. भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा प्रभारी भरत गोरे उपस्थित सर्व पदाधिकारी यांना या विधानसभेतील सर्व मतदार भाजपासोबत महायुती सोबतच राहील अशा प्रकारचा शब्द देत या मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य देण्यासाठी भटके विमुक्त जाती जमातीतील मतदार कार्याचा वाटा उचलतील यत तीळमात्र शंका नाही या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार राणे साहेब यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे राणीसाहेबांचाच विजय निश्चित आहे असे प्रतिपादन केले. प्रचार बैठकीची प्रस्तावना भाजप भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस दीपक खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाचिटणीस विजय जंगले केले. उपस्थित सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन राजन डोईफोडे यांच्या सह सर्व ग्रामस्थांनी सन्मान केला. यावेळी समाजाच्या समस्या जाणून घेत समाज भवन, स्ट्रीट लाईट, वैयक्तिक लाभाचे कामे कशा प्रकारच्या मागण्या ग्रामस्थांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे केल्या 4 जून नंतर आचारसंहिता संपल्यावर त्या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना करण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकारी दिले.यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, रासप कोकण प्रांत अध्यक्ष मयेकर मॅडम,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भरत गोरे,जिल्हा सरचिटणीस दिपक खरात,जिल्हा चिटणीस विजय जंगले सावंतवाडी आंबोली मंडल अध्यक्ष दीपक पाटील, राजन डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्य जंगले, दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी शितल काळे, रासप जिल्हा कार्यकारी सदस्य तन्मय राणे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*