वारकरी समाज पंतप्रधान मोदी आणि ना. नारायण राणे यांच्या भक्कम पाठीशी : कोकरे महाराज
आपल्याला फक्त जय श्रीरामाचे नारे देऊन भागणार नाही तर प्रत्येकाने आता देशासाठी आणि देशासाठी अविरत काम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कोकणाने सज्ज झाले पाहिजे, मोदींना मत का तर आज आपला 500 वर्षानंतर राम स्वाभिमानाने 5 हजार कोटींच्या मंदिरात राहतो आहे.
पूर्वी मुसलमानांना भडकवले जायचे पण आता त्यांच्या हातात मोदींनी कॉम्प्युटर दिला आहे, विकासाच्या प्रक्रियेत घेतले आहे असं म्हणत कोकरे महाराज म्हणाले की वारकरी समाज मोदींच्या बाजूने उभा आहे,आज उध्दव ठाकरे यांचा आजूबाजूच्या शकुनी मामांमुळे पराभव झाला आहे त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे. आपलं हिंदुत्व खर आहे आणि यासाठी वारकरी पंथाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ना. नारायण राणे यांना भक्कम पाठिंबा आहे