सावंतवाडी :
आजगाव येथे विनय सौदागर कुटुंबियांच्या वतीने बाबांची जन्मशताब्दी (कै. वामन नारायण सौदागर) अंतर्गत ३०/८/२३ ते ३०/८/२४ पर्यंत दर महिन्याला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मुलांचे अक्षर सुधारावे, सुवाच्छ लिहिता यावे याकरिता हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गात एकूण १६ मुलांनी सहभाग घेतला.
हस्ताक्षर सुधार वर्गाला सकाळी ९:३० वाजता सुरुवात झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील मुलांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. एकूण १६ मुलांनी सहभाग घेतला होता. मुग्धा सौदागर हिने हस्ताक्षर सुधारणांबाबत अतिशय सुरेख मार्गदर्शन केले. यावेळी हस्ताक्षर सुधार वर्गातील सर्व मुलांना पेन भेट देण्यात आले. तसेच इंग्लिश मार्गदर्शन वर्गातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांना कंपास बाॅक्स व श्यामची आई पुस्तक भेट देण्यात आले. हा खर्च आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सौदागर कुटुंबियांकडून करणेत आला. वडीलांच्या जन्म शताब्दीनिमित्त या वर्षी दर महिन्यात एक उपक्रम राबविण्यात येतो अशी माहिती साहित्यिक विनय सौदागर यांनी दिली. अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवून शालेय मुलांना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केल्या बाबत सामाजिक स्तरावरून विनय सौदागर कुटुंबीयांचे कौतुक केले जात आहे.