You are currently viewing “तिमिरातुनि तेजाकडे” अंध दिव्यांग गायकांचा दहा गाण्यांचा अल्बम पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशित

“तिमिरातुनि तेजाकडे” अंध दिव्यांग गायकांचा दहा गाण्यांचा अल्बम पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशित

*स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमीची निर्मिती*

 

मुंबई / दादर :

स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी निर्मित ‘तिमिरातुनि तेजाकडे’ हा भारतातील पहिला अंध दिव्यांग गायकांचा १० गाणी समाविष्ट असलेला संगीत अल्बम *’पद्मश्री अनुराधा पौडवाल’* यांच्या हस्ते रविवार दि.१ मे २०२४ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर इथे प्रकाशित झाला.

यावेळी ज्येष्ठ निर्माती, दिग्दर्शिका, सब टीव्ही चॅनेल्सच्या प्रमुख कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम, विजय पाटकर, प्रमोद पवार, विनय येडेकर,या अलबमचे संगीतकारआणि त्यागराज म्युझिक अकॅडमीचे प्रमुख त्यागराज खाडिलकर, स्वरकुल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वीणा खाडिलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते सर्व गीतकारांचा आणि गायकांचा सत्कार करण्यात आला.

या अल्बम मधील गीतांचा आस्वाद आपण Swarkul Trust या युट्यूबवर, हंगामा, स्पोटिफाय, गाना.कॉम… इत्यादी ठिकाणी घेऊ शकता.

या कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना डॉ वीणा त्यागराज खाडिलकर यांची होती.

 

@ विजय जोशी

डोंबिवली

9892752242

प्रतिक्रिया व्यक्त करा