*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि.देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*
*काव्यपुष्प – ७६ वे*
—————————————–
“राममय “अवघे गोंदवले । रामनाम सर्वत्र दुमदुमले ।
श्रीमहाराजानी पटवले । महत्व नामाचे ।। १ ।।
नवख्याने इथे येता पाहिले । आश्चर्य तयांच्या मनी दाटले ।
त्यास दिसले । जन अवघे “रामभक्त ” ।। २ ।।
श्रीमहाराजांची किमया । भेटविती रामराया । मग जडे
भक्ती -माया । जनांची ।। ३ ।।
श्रीमहाराजांचे जीवन तत्व । राम नाम हे सत्व । अपार याचे महत्व । रुजविती सर्वांच्या मनात ।। ४ ।।
राममंदिर गोंदवल्याचे । जाहले ज्ञानपीठ भक्तीचे ।
इथे धडे भक्तीचे । शिकविती श्रीमहाराज ।। ५ ।।
नाना तऱ्हेचे, स्वभावाचे । वृत्तीचे, विचारांचे । भ्रष्ट मती- भ्रष्ट नियतीचे । असेही येती लोक ,महाराजांकडे ।। ६ ।।
तरी ही श्रीमहाराजांचे वागणे । बोलणे, सांगणे ।
समजावणे । एकसारखे असे सगळ्यांशी ।। ७ ।।
श्रीमहाराजांच्या मनी तळमळ । अंत:करणी कळकळ।
नसे त्यात मळ । भावना कल्याणकारी सर्वांसाठी ।। ८ ।।
***************************
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास
—————————————–
-अरुण वि.देशपांडे-पुणे
————————————–