कुडाळ :
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ यानी प्रगती पाताडे लिखित ‘अबोली ‘ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्ययक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाखाध्यक्ष वृंदा कांबळी, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, प्रमुख पाहुणे प्रा. लैखक भाऊसाहेब गोसावी, निवृत्त केंद्रप्रमुख मनोहर सरमळकर, दादा पाताडे, निवृत्त प्रा. रिमा भोसले, कवयित्री प्रगती पाताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अबोली काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे प्रा. भाऊसाहेब गोसावी यानी पुस्तकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ‘ अबोली ‘ या काव्यसंग्रहातील कविता स्त्री जाणिवांचा शोध घेते. ती व्यक्तिगत भावजीवनाशी फार रमते.या काव्यसंग्रहात व्यक्तिगत जीवनापासून सामाजिक समस्यांपर्यंत अनेक विषय हाताळले आहेत. ही कविता नव्या जाणिवांमधून व्यक्त होणारी कविता आहे. स्त्रीमनाची चौकटीत असलेली घुसमट फोडू पहाणारी कविता आहे. अशा शब्दात अबोली संग्रहातील कवितेचे वर्णन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मसके , मनोहर सरमळकर, रिमा भोसले यानी आपल्या मनोगतातून कवयित्रीला शुभेच्छा दिल्या. स्मिता नाबर यानी दोन कवितांचे वाचनकेले. जिल्हाध्यक्षानी कोमसापच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेऊन कोमसापच्या वतीने शुभेच्छा दिल्या. नायब तहसीलदार प्रदीप पवार यानीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कोमसाप कुडाळ शाखा करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
प्रस्ताविक सचिव सुरेश पवार यानी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष स्नेहल फणसळकर यानी केले. मान्यवरांचा परिचय गोविंद पवार यानी करून दिला. अध्यक्षीय भाषणात लैखिका वृंदा कांबळी यानी अबोली काव्यसंग्रहाथीलशकवितांची वैशिष्ट्ये सांगून आज नव्यानेच कोमसापशी जोडले गेलेल्या लोकानी कोमसापला नैहमी अशीच साथ द्यावी असे आवाहन केले. आभार संदीप साळसकर यानी मानले. कार्यक्रमाला रसिकांची असलेली उपस्थिती लक्षणीय होती. कवयित्री प्रगती पाताडे यानी साठ वर्षानंतर कविता लिहायला सुरूवात केली. तो आपला प्रवास कसा झाला, कोणाकोणाची व कशी मदत मिळत गेली व पुस्तक होऊ शकले याविषयी सविस्तर मनोगत कवयित्रीने व्यक्त केले. कुडाळ कोमसाप शाखेच्या वतीने भाऊसाहेब गोसावी व प्रगती पाताडे यांचा शाल, श्रीफल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.