सांगुळवाडीतील उबाठाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांचा भाजपात जाहीर प्रवेश
आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती
वैभववाडी
सांगुळवाडी येथील उबाठा गटाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सांगुळवाडी गावचे शाखाप्रमुख शशिकांत भगवान रावराणे, शाखाप्रमुख योगेश मधुकर पांचाळ, बूथ प्रमुख संतोष राजाराम रावराणे या तिघांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेश वेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण रावराणे, सत्यवान पाटील, बाळाजी रावराणे, संजय विश्वासराव व पदाधिकारी उपस्थित होते.