*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवितेमुळे*
कवितेमुळे अनेकांनी
म्हटले मला वेडी.
पण कवितेनेच आणली
जीवनात गोडी.
कवितेमुळे जरी झाले
काही वेळा दु:खी.
पण शेवटी कवितेनेच
केले मला सुखी.
कवितेमुळे कधी कोणी
केला अपमान.
कवितेमुळेच आज मिळतो
सर्वत्र सन्मान.
कधी वाटले कवितेमुळे
झाले अपयशी.
पण कवितेनेच शेवटी
केले मला यशस्वी.
जीवनात जेव्हा जेव्हा
मी निराश होते.
कविता माझ्याजवळ येऊन
मला कुशीत घेते.
*अनुपमा जाधव*
डहाणू जिल्हा पालघर
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७