*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गृहिणी सर्वत्र पूज्यते*
ज्ञानाचे सर्व विवेक मार्ग
भूक शमनातून जातात |
भुकेल्याचे ब्रह्मज्ञान मार्ग
अन्नदान मार्गेच जातात ||१||
असे महत्कार्य जी करिते
ती गृहिणी अन्नपूर्णा आई |
घर प्रेमाचे बांधते पक्के
आरोग्या सकस अन्न देई ||२||
धुणीभांडी कपडालत्ताही
करि सुमने कामे अखंड |
तिचे मोल असे अनमोल
दिव्य कुणी जाणील अखंड ||३||
सफल कुटुंबाचीच चिंता
स्व तन मन अनंता चिंता |
ना कलह लाभे गृहशांती
याच अन्नपूर्णेस वंदिता ||४||
स्त्री मनी कोमल घरपण
सांभाळून हे मूल्य धरिणी
नच ती केवळ हो गृहिणी
ती अंतर्बाह्य शिव धारिणी ||५||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.-वेंगुर्ला,
जि.-सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.