गवारेड्याच्या हल्ल्याच्या तिसऱ्या घटनेनंतर वनविभाग ॲक्शन मोड ; वररस्त्याच्या दुतर्फा खबरदारीचे फलक
वाहने सावकाश हाकण्याचे केले आवाहन
देवगड : प्रतिनिधी
देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राक्षसघाटी येथे शनिवारी गव्याच्या हल्ल्यात चारचाकीचे नुकसान झाले त्यानंतर अवघ्या २४ तासात रविवारी सायंकाळी वनविभागाने दुर्घटना घडलेल्या ठिकाणी खबरदारी घ्या !! सदर परिसरात वन्यप्राणी रानगव्याचा वावर आहे. वहाने सावकाश हाका अशा आशयाचे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावले आहेत.
शिरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून समाधान होत आहे तिसऱ्या घटनेनंतर का होईना मात्र वनविभागाला याची जाग आली.
सावंतवाडी वनविभागाच्या कणकवली वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवगड तालुक्यातील शिरगाव गावात तीनदा गव्याच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातील शिरगांव-कुवळे मार्गावर चौकेवाडी फाट्यानजीक दुचाकीला एकदा तर राक्षसघाटी येथे चारचाकी वहानांना दोनदा गव्याने लक्ष केले आहे या तिन्ही घटनेत वहानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर वनविभागाने राक्षसघाटी येथे फलक लावून ग्रामस्थानी कोणती काळजी घ्यावी या बाबतच्या सुचना दिल्या आहेत यात सुचनामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा.
बिबट्या व रानगवे रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा. रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरित्या लॉक लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळा. रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृंद्धांना एकटे सोडू नका. रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा मोठ्याने म्युझिक लावा. घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक लावा. घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाईट लावा. घराच्या आसपास झाडेझुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा. घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा तसे न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि बिबट्या त्याकडे आकर्षित होतो. अचानक बिबट्या किंवा रानगवा जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या त्यांना डिवचण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका आणि तात्काळ वन विभागाला कळवा.अशा सुचना वनविभागाने फलक लावून केल्या आहेत.